धाराशिव (साक्षी पावनज्योत) – प्रत्येक सामाजिक संस्थेला सी.एस.आर फंड मिळतोच ह्या आत्मविश्वासाने कार्य करत राहून एन.पी.ओ प्रत्येक पातळीवर कार्यरत ठेवणे गरजेचे असल्याचे ठोस प्रतिपादन सीता ट्रस्ट अहिल्यानगरचे सी.ए.शंकर अनदाणी यांनी एक दिवशीय कार्यशाळेत केले. दिनांक ९ मे रोजी श्री.समर्थ हॉटेल धाराशिव येथे सीता ट्रस्ट,अहिल्यानगरच्या वतीने सी.ए.शंकर घनश्यामदास अनदाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक संस्थांची एक दिवशीय कार्यशाळा प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली. या कार्यशाळेत धाराशिव जिल्ह्यातील ६० स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदवला.सीता ट्रस्टचे सर्वेसर्वा सी.ए.शंकर अनदाणी यांनी सी.एस.आर फंड म्हणजे काय आणि तो कसा मिळवायचा,सरकारी सी.एस.आर फंड प्रकल्पांची प्रक्रिया,पब्लिक कंपन्यांचे सी.एस.आर फंड प्रकल्प आणि त्यांच्या योजना,अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक असणारी कागदपत्रे यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी