दहिफळ – विश्वरत्न,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी दहिफळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव दहिफळच्या वतीने साजरी करण्यात आली. सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जेट्टीथोर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजय दादा गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर मिरवणुकीचे उद्घाटक विजय दादा गायकवाड व दादासाहेब जेटीथोर यांचे जयंती उत्सव समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विचार व्यक्त केले. आपल्या भाषणात उद्घाटक विजय दादा गायकवाड म्हणाले की येणारे शतक हे डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचे असेल,डॉ.बाबासाहेबांच्या विचारांना जग आज मानवंदना देत आहे.हा आंबेडकरी विचाराचा विजय आहे. दादासाहेब यांनी आजच्या परिस्थितीवर सामाजिक आर्थिक विषयावर भाष्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड.अजित कांबळे यांनी केले पाहुण्यांचा परिचय उत्सव समितीचे उपाध्यक्ष जयंत भाऊ अंगरखे यांनी केले सूत्रसंचालन अभिजीत अंगरखे यांनी केले त्यानंतर गावातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमास डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष जैन तांगरखे,सचिव विनोद कांबळे,महादेव कांबळे, आनंद कांबळे,भुजंग कांबळे, बाळू अंगरखे,रोहित कांबळे, संतोष खुणे,सुरज अंगरखे, अभिजीत अंगरखे,अमोल अंगरखे,वसंत अंगरखे,दत्ता खंडागळे या सर्वांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास जयश्री कांबळे,शालन बाई कांबळे, पुष्पाबाई अंगरखे,वैशाली कांबळे,निकिता कांबळे, सुनीता कांबळे,प्रीती कांबळे,प्रेमाताई कांबळे,सुषमा अंगरखे,भामाबाई कांबळे,अर्चनाताई अंगरखे, भाग्यश्री कांबळे यांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर या मिरवणुकीला गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी महिला बालक सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित होते.
More Stories
मोहेकर महाविद्यालयचे घवघवीत यश
राष्ट्रीय ओबीसी शिक्षक संघाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई सुडे यांचा सत्कार
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचा कलादर्पण महोत्सव उत्साहात