September 21, 2026

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

  • कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सरपंच नानासाहेब पिंगळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अंजली जाधव,पोलीस पाटील बालाजी चिंचकर,मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,बप्पासाहेब पिंगळे,कुंडलिक पिंगळे,श्रीकांत पिंगळे,सौ.शारदा पिंगळे,सौ.धनश्री पिंगळे,सौ. जनाबाई जाधव,आशाबाई रणदिवे,मार्गदर्शक शिक्षिका सरोजिनी पोते,धनंजय गव्हाणे, मनिषा पवार या सर्वांच्या शुभहस्ते यशवंत विद्यार्थिनी कु.गौरी श्रीकांत पिंगळे व कु.आदिती धनराज पिंगळे यांचा शाळेच्या वतीने शाल,बुके, पुष्पहार,छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक,पॅड,पेन व शालेय साहित्य देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक सरोजिनी पोते व धनंजय गव्हाणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज पुस्तक व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी मार्गदर्शन केले.
error: Content is protected !!