खामसवाडी – कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश विद्यार्थ्यांनी संपादीत केले असल्याने प्रशालेच्या वतीने दि.२६ एप्रिल २०२५ रोजी पात्र झालेल्या इयत्ता ५वी च्या दोन विद्यार्थ्यांचा व इयत्ता ८ वी च्या आठ विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समिती व प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी इयत्ता ८ वी मधील पात्र विद्यार्थीनी कु.गौरी सावत,कुमार शोयब मुंडे,कुमारी मानसी शेळके,कुमारी भक्ती जोगी,कुमारी अनम तांबोळी,कुमारी मीरा वाघ,कुमारी प्रतीक्षा वरपे ,कुमारी श्रावणी गरड तर इयत्ता ५ वी मधील पात्र विद्यार्थी कुमारी भक्ती मनोज पाटुळे व कुमारी सिमरन मिया मुंडे या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शक करणारे शिक्षक तुकाराम सूरवसे, सुधाकर सुरवसे,काळे डि.एस ,श्रीमती लिंबोरे ,अंगद जाधव,शिवाजी वाघमारे,आणि विलास भंडारे आदी शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील शिक्षकांनी पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा पत्रकार दिपक सावत, मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे, महाराष्ट्र ग्रामीण बँक चे कर्मचारी हरिभाऊ भन्साळी,पालक खयुम हसन शेख यांच्या सह प्रशालेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामचंद्र पवार यांनी मानले.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी