मातोळा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – औसा तालुक्यातील श्री माधवराव भोसले हायस्कूल, मातोळा येथे विश्वरत्न,संविधान शिल्पकार,प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळ्याचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने,तसेच प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य अजित साळवे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.यानंतर पर्यवेक्षक डबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाला माणूसपण दिले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळाला आणि संविधानाच्या माध्यमातून समानतेचा अधिकार प्राप्त झाला.” या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेची आणि संविधानाच्या मूल्यांची जाण निर्माण झाली.
More Stories
मातोळ्यात एनएमएमएसचा यशोत्सव;श्री माधवराव भोसले हायस्कूलचे आठ विद्यार्थी उत्तीर्ण
मातोळ्यात जिजाऊ–विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मातोळ्यात आदरांजली;शिक्षक-कर्मचाऱ्यांचा सहभाग