कळंब (विशाल पवार) – कळंब शहरातील विद्याभवन हायस्कूलमध्ये संविधानाचे शिल्पकार,प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.हा कार्यक्रम ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळ्याचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि त्यांच्या समाजहितासाठीच्या संघर्षाची आठवण करून देण्यात आली. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी