February 9, 2026

ज्ञान प्रसार विद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

  • मोहा ( साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    हा कार्यक्रम ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १४ एप्रिल २०२५ रोजी पार पडला.
    कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.यानंतर प्राचार्य जगताप यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजासाठी आणि संविधान निर्मितीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा उल्लेख केला.त्यांनी सांगितले की, “भारतीय संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत हक्क प्राप्त झाले असून, यामुळेच २१व्या शतकातही जबाबदार,युक्त नागरिक म्हणून आपण स्वातंत्र्याचे फळ अनुभवत आहोत.”
    या कार्यक्रमास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर,उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक सुनील साबळे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून,युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
error: Content is protected !!