June 20, 2025

सा.साक्षी पावनज्योतच्या क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

  • कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कासाठी कळंब शहरातून सातत्याने प्रकाशित होणाऱ्या साक्षी पावनज्योत या साप्ताहिकाचा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक दि.१४ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात प्रकाशित करण्यात आला.
  • शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ,माजी नगरसेवक सुनील गायकवाड आणि शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ.शंकर कांबळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमास सा.साक्षी पावनज्योतचे मुख्य संपादक सुभाष घोडके,उपसंपादक माधवसिंग राजपूत,शहर प्रतिनिधी महेश फाटक, शिराढोण प्रतिनिधी परमेश्वर खडबडे,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके तसेच लोक जनशक्ती पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्यासह शिवदास आदमाने,सुरेंद्र शिलवंत,श्रीहरी सावंत,प्रशांत धावारे,सागर पट्टेकर,सुरज गायकवाड,प्रशांत हौसलमल,नागेश धीरे,चरणसिंह गायकवाड,सुरज जानराव,बंडू आबा ताटे आणि शहरातील असंख्य वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या विशेषांकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन,विचारांचे अनुकरण आणि परिवर्तनाची दिशा निश्चित करण्यात येईल, असा विश्वास यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
error: Content is protected !!