कळंब – जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वाणीतून महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.यावेळी शालेय मंत्रिमंडळातील सर्व सदस्य मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री यांच्यासह सर्वांनीच या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. शाळेचे सहशिक्षक मकरंद नाडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर सविस्तर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना अनेक बाबी समजावून दिल्या. शाळेचे कर्तव्यशील मुख्याध्यापक संतोष भोजने यांनी अध्यक्षीय समारोप करत महात्मा फुले यांचे जीवन चरित्र अभ्यासणे ही काळाची गरज आहे तसेच महात्मा फुलेंचे विचार आजही आपल्याला तंतोतंत लागू पडतात. त्याकाळच्या समस्या आजही समाजामध्ये आपल्याला दिसून येतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सहशिक्षिका श्रीमती भारती सूर्यवंशी,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कुमारी मंजुश्री कराड या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज विजय शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन चिरंजीव अजिंक्य नाना वटाणे यांनी केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी