August 10, 2025

वेेद शैक्षणिक संकुलात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुलअंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दि.११ एप्रिल २०२५ वार शुक्रवार रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
    या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य सतिश मातने यांच्या शुभहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमास प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशिका कोमल मगर,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!