धाराशिव (जिमाका) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने १ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत ‘समता पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम २०२५ -२६ मधील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष जात वैधता प्रमाणपत्र मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेंतर्गत,तालुका व महाविद्यालय निहाय विद्यार्थ्यांची संख्यात्मक माहिती संकलित करण्यात येणार आहे.तसेच सीईटी परीक्षेस बसणाऱ्या व डिप्लोमा तृतीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरावेत यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. समान संधी केंद्राच्या माध्यमातून अर्ज जमा करून तत्काळ कार्यवाही केली जाणार असून,विद्यार्थ्यांनी स्वतःच्या महाविद्यालयात पूर्ण अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान