कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – भूमीपुत्र वाघ यांच्या आभाळमाया काव्यसंग्रहातील शब्दरचना आणि सरूबाई डोके यांच्या जात्यावरील ओव्यातून रक्ताच्या नात्यापलीकडे असणाऱ्या स्नेहभावनांचा अविष्कार असल्याचे ठोस प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी पुस्तक प्रकाशन सोहळा व कविसंमेलनाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले. उमरगा येथील समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ लिखित आभाळमाया काव्यसंग्रह व सरुबाई डोके यांच्या जात्यावरील ओव्या या दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळा व कवी संमेलन दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता हासेगाव ता.कळंब येथील पर्याय संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. प्रकाशन सोहळ्यासाठी प्राचार्य डॉ.व्यंकठ अनिगुंठे,प्राचार्य डॉ.गोविंद बिराजदार, प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर,रमाकांत कुलकर्णी आदींनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.
या सोहळ्याची प्रस्तावना करत असतानी भूमीपुत्र वाघ यांना सरूबाई डोके यांच्या आठवणी आवरता आल्या नसल्याने आश्रूंना वाट मोकळी करावी लागली.त्यामुळे सभागृहातील प्रेक्षकांच्या सुद्धा भावना दाटून आल्या. या प्रकाशन सोहळ्यानंतर कवीसंमेलनात ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे,रमेश बोर्डेकर,सुभाष घोडके,रमाकांत कुलकर्णी,गझलकार शेखर गिरी, दिलीप मोरे,प्रा.मनीषा कदम, ओम प्रकाश गिरी,रेखा कदम, संतोष लिमकर,दिलीप कांबळे आदींनी कविता सादर केल्या.सहभागी कवींना महाराष्ट्र लोक विकास मंच तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे भारदस्त असे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट यांनी केले तर भूमिपुत्र वाघ यांनी आभार मानले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर