August 9, 2025

रायप्पा व गोविंद गायकवाड यांच्या इतिहासावर चित्रपट काढावा – आपचे बार्टीला निवेदन

  • पुणे – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी महार इतिहासावरती चित्रपट काढण्यात यावा.छत्रपती संभाजी महाराजांचे निष्ठावंत आणि विश्वासू मित्र आणि सेवक रायप्पा महार हे मानले जायचे.संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला.रायप्पा महार हे संभाजीराजांच्या अंगरक्षकापैकी एक होते. रायप्पांच्या पराक्रमाची दखल घेऊन संभाजी राजांनी दरबारात त्यांचा सन्मान सुद्धा केला होता. रायप्पा महार हे संभाजी राजांचे निष्ठावंत आणि विश्वासू सेवक होते.संभाजी राजांना जेव्हा पकडण्यात आले.मुघलांनी बहादूर गड येथे नेले त्यांच्यावर अमानुष छळ सुरू झाला ही बातमी कळताच रायपाचे रक्त सळसळू लागलं.रायप्पा यांनी वेशांतर करून मोगल छावणी घुसण्यासाठी भिस्ती पाणी वाहणाऱ्या लोकांचा वेश घातला. लाखोंच्या सैन्यातून वाट काढत ते बहादूर गडाच्या पायथ्याशी पोहोचले.मुघलांनी एका दुपारी संभाजी राजांची दिंड काढली जात असल्याचे पाहताच रायाप्पा संतापले.मरहट्टा संभा हे शब्द ऐकून तो सैनिकांच्या अंगावर ते धावून गेले.रायप्पा ने अनेक अंमलदारांना ठार मारले.त्यांच्या या भीषण हल्ल्याने औरंगजेब हादरला.पण मुगल सैन्याने त्यांच्यावर असंख्य समरेशेरीचे वार केले.त्यामध्ये शूरवीराचा बलिदान रायप्पाचं रक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाशी सांडलं.रायप्पा महाराने इतिहासात अजरामर बलिदान दिलं.औरंगजिबाने त्यांना कृपणे अत्यंत हालहाल करून ठार मारण्याचे आदेश दिला.सुमारे 40 दिवसांपर्यंत यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिरिष्ठा सोडली नाही.11 मार्च 1689 रोजी संभाजी राजांची शिवछेद करून भीमा आणि इंद्रायणी संगमावरील वडू तुळापूर येथे शरीराचे तुकडे करून फेकण्यात आले होते.तेथे स्थानिक गावकरी गोविंद गणपत महार यांनी संभाजी महाराजांचे ते तुकडे एकत्र करून त्यांचे अंतिम संस्कार वडू बुद्रुक येथे केले. गोविंद गणपत गायकवाड महार यांनी अंतिम संस्कार सन्मानाने केले.वडू बुद्रुक येथे गोविंद गायकवाड यांची समाधी सुद्धा आहे.अशा महार जातीचे अनेक शूर वीरांचा चित्रपटाच्या माध्यमातून इतिहास जागा करण्यात यावा.त्यामुळे बौद्ध समाज यांच्या पूर्वजांनी काय केलंय असा इतिहास समोर आला पाहिजे.आम आदमी पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांच्या कडून बार्टी,पुणे यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळेस निखिल अंधारे,युवा अध्यक्ष अजिंक्य जगदाळे,सुभाष कारंडे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!