June 20, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे अध्यक्ष तुषार रणदिवे यांची निवड

  • कळंब – परमपूज्य बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कल्पना नगर,बाबा नगर,महसूल कॉलनी, यशवंत नगर व रंगीला चौक संयुक्त बैठक ही सतपाल बनसोडे,बंडूभाऊ बनसोडे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात घेण्यात आली.
    या बैठकीमध्ये जयंती कमिटीचे अध्यक्षपदी तुषार रणदिवे, उपाध्यक्ष बळीराजे चव्हाण,कोषाध्यक्ष संदीप सोनवणे,कार्याध्यक्ष रंजन घाडगे, सचिव शक्ती नलावडे,संघटक राजा सय्यद,नियोजन राकेश जगताप,सांस्कृतिक प्रमुख भैय्या जगताप,सनी कांबळे,मिरवणूक प्रमुख बाळासाहेब हौसलमल, यश बनसोडे,धम्मा गायकवाड, बापू सावंत,गणेश कसबे,विजय जानराव,सौरभ गायकवाड,सनी गायकवाड,विनोद जगताप, सल्लागार राहुल हौसलमल यांची तर मार्गदर्शक सुनील गायकवाड ,सुधीर बनसोडे यांची निवड करण्यात आली.बैठकीमध्ये सर्व जाती-धर्माचे प्रतिनिधी मिळवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्याचे ठरले तसेच जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार असून मिरवणुकीत देखावे तसेच झांज पथक लेझीम पथक इत्यादी कार्यक्रम घ्यायचे ठरले आहे.
error: Content is protected !!