September 24, 2026

भीमशोर्य प्रतिष्ठानची भीम महोत्सव कार्यकारणी जाहीर

  • धाराशिव –दिनांक 1 मार्च 2025 रोजी मध्ये सुभेदार रामजी आंबेडकर नगर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 व्या जयंतीनिमित्त बैठक माजी नगरसेवक राणा (भैय्या) बनसोडे,निलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत जयंती अध्यक्ष आकाश बाळासाहेब जाधव,उपाध्यक्ष सुरज गाडे,सचिव बाळासाहेब बनसोडे,कोषाध्यक्ष रत्नदीप चव्हाण,मिरवणूक प्रमुख सौरभ लोंढे,सांस्कृतिक प्रमुख अभय गालटे,देखावा प्रमुख महेश कांबळे या सर्व पदाधिकारी यांचे सर्वानुमते निवड करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
    तसेच या बैठकीत सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!