कळंब – येथील इनरव्हिल क्लबच्या पुढाकाराने घेतल्या गेलेल्या एच पी व्ही लसीकरण अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत असून २५ फेब्रुवारी रोजी २५ ( पंचेवीस) मुलिंना पहिला डोस देण्यात आला. गेल्या आठवड्यात या लसी संदर्भात शहरातील सर्व शाळा व कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक व पालकांना माहिती देण्यात आली होती. यासाठी इनरव्हिल क्लब,इंडियन मेडिकल असोसिएशन,बाल आरोग्य परिषद व स्त्री आरोग्य परिषदेच्या पदाधिका-यांचा सहभाग होता. दि २५ फेब्रुवारी रोजी विजया नर्सिंग होम येथे २५ लाभार्थींना पहिला डोस देऊन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.इतर लाभार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन म्हणजे शनिवार दि ८ मार्च २०२५ रोजी डोस देण्यात येणार आहे असे आयोजका तर्फ कळविण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त मुलिंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी