March 26, 2026

ज्ञान प्रसार मध्ये इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर हे होते तर प्रमुख उपस्थिती धाराशिव जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी दत्तात्रेय लांडगे यांची होती. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप, माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.बी.मडके यांची उपस्थिती होती.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत गुंगे यांनी केले.विद्यार्थ्यांनी मोबाईल वरती न राहता आपल्या करिअर वरती लक्ष केंद्रित करावे व जास्तीत जास्त दहावीच्या परीक्षेमध्ये मार्क्स कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी दहावीच्या स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक ओंकार मडके,पर्यवेक्षक चेडे नेहा,पर्यवेक्षक वैष्णवी माळी, उपमुख्याध्यापक ऋतुजा थोरे, प्रथमेश माळी,श्रीनाथ लकडे, ओमकार मडके,सार्थक मडके, ओबिया सय्यद,साक्षी बारखोते, ईश्वरी मडके,शिवानी मडके,अथर्व वरपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपामध्ये रमेश मोहेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,विद्यार्थ्यांनी कुठल्याही क्षेत्रात मागे न राहता प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला पाहिजे.त्यासाठी आधुनिकतेची कास धरली पाहिजे.त्यांनी अनेक विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    प्राचार्य श्री.जगताप यांनी वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.दहावीनंतर अनेक मार्ग असतात परंतु गोंधळून न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.व सर्व विद्यार्थ्यांना एसएससी परीक्षासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत गुंगे व तर आभार सतीश मडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व सहकारी बंधू भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!