June 19, 2025

भगवान दहीरे यांचे दुःखद निधन

  • कळंब – बनकरंजा (ता.केज,जि. बीड) येथील भगवान झेलबा दहीरे (वय ८५) यांचे वृद्धापकाळ व अल्पशा आजाराने दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजता दुःखद निधन झाले.
    स्वतःच्या कष्टाने व प्रामाणिक व्यवसायातून त्यांनी गावातील स्वस्त धान्य दुकान आणि रॉकेल विक्रीचा व्यवसाय यशस्वीपणे चालवला.आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी तीन एकर शेती संपादन केली तसेच मासेमारी व्यवसायातही त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला.आपल्या आपुलकीच्या स्वभावामुळे ते गावकऱ्यांचे आणि नातेवाईकांचे लाडके दादा होते.
    त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
    त्यांच्या निधनाने गावाने एक कष्टाळू,प्रामाणिक आणि प्रेमळ व्यक्ती गमावली आहे.त्यांना सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
error: Content is protected !!