बदलापूर – नवी दिल्ली येथे १३ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान झालेल्या स्वर्गीय इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर,कर्णधार प्रियंका इंगळे पुणे हीच्या नेतृत्वाखाली महिला खोखो विश्वचषकात ७८-४०, गुणांनी नेपाळवर मात करून देशाला पहिले अजिंक्यपद मिळवून दिले.१५ खेळाडूंच्या महिला संघात शांतीनगर बदलापूर (पश्चिम)येथील रेश्मा भूमीबाई सुभाष राठोड हीने अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी केल्याबद्दल सुवर्णमहोत्सवी माघी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आदरणीय उल्हासभाई आंबवणे व मा.नगरसेविका सौ.उज्वलाताई आंबवणे यांच्या हस्ते श्री.गणेशोत्सवात मानाची “श्रीगणेश ट्राफी” शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश दहिवलीकर,पदाधिकारी हरिश्चंद्र थोरात,योगेश धोत्रे,विरेश धोत्रे,विनोद जाधव,सचिन जाधव,समिर मुरकुटे,अविनाश खिल्लारे, प्रफुल्ल मोडक, राकेश जगे यांच्यासह प्रशिक्षक पंढरीनाथ म्हस्कर नरेंद्र मेंगळ सर व तीचे आईवडील उपस्थित होते.माघी श्री.गणेशोत्सव मंडळ गेली छप्पन्न वर्षे कला, क्रीडा, साहित्य, वैद्यकीय सेवा बजावणा-यांचा नेहमीच आदर करीत आले आहे. बदलापूरातील शिवभक्त शाळेतील विद्यार्थीनी “कु.रेश्मा राठोड “हीच्या सारख्या माणिक मोत्यांना वेचून त्यांना प्रकाश झोतात आणून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आले आहे.याबद्दल शहरात तीचे कौतुक व आनंद व्यक्त होत आहे.!
— @ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन,सोशल मीडिया ठाणे-९३२४३६६७०९
More Stories
बदलापूरमध्ये ‘प्रबोधन कट्टा’चा शुभारंभ;शिक्षण-करिअर मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ओंकार सोनवणे यांच्या गझल गायकीने रसिक मंत्रमुग्ध
उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश;अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड