मोहा – गावातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यानंतर उपस्थित मान्यवरांनी माता रमाई यांच्या त्यागमयी जीवनकार्यावर भाषण दिले.या वेळी रमाई यांच्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कसबे,विशाल कसबे,महावीर कसबे,गणेश कसबे,राहुल कसबे,प्रवीण कसबे,आकाश कसबे,अश्रूबा नागटिळक,सौरभ मोहोळ,संकेत कसबे,कृष्ण हिरवे व महिलांची उपस्थिती होती.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन