June 20, 2025

माता रमाई असीम त्यागाचे प्रतीक – भिक्खु पय्यानंद थेरो

  • लातूर – माता रमाई या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी होत्या.माता रमाईच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वातील अद्वितीय व्यक्तिमत्व तथा भारतीय घटनेचे शिल्पकार होऊ शकले.त्यामुळे माता रमाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील असीम त्यागाचे प्रतीक होत.असे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी केले आहे.
    माता रमाई आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात डॉ.बाबासाहेबांच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक कष्ट आणि त्याग सहन केले.गरीबी, अपार दु:खाचा सामना करत, त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या ध्येयात पूर्ण साथ दिली.त्यांच्या या त्यागामुळेच बाबासाहेब समाजासाठी संपूर्णतः झोकून देऊ शकले.असे ही आपल्या मार्गदर्शनात सांगितले
    त्यागमूर्ती माता रमाई यांची १२७ जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे साजरी करण्यात आली.
    या वेळी प्राचार्य डॉ. संजय गवई, भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हा अध्यक्ष एम.एम. बलांडे ,प्रा.विश्वनाथ आल्टे यांनीही हि आपापले मनोगते व्यक्त केली.
    या प्रसंगी भिक्खु पय्यानंद थेरो यांनी मार्गदर्शन करून सर्वांना माता रमाई यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
    या प्रसंगी विजय चौधरी, अनिरुद्ध बनसोडे,राहुल शाक्यमुनी,शिवाजी सोनकांबळे,कुमार सोनकांबळे, सुधाकर कांबळे,विक्रम शिरसाठ, रवी गायकवाड,विनय जाकते,उदय सोनवणे,ज्योतीराम लामतुरे, निल धावारे, निलेश बनसोडे, विशाल वाहुळे, मिलिंद धावारे,बालिका जोगदंड, शकुंतला नेत्रगावगर,बेबीताई कांबळे, कविता धावारे,त्रिशाला घोडके,अस्मिता शाक्यमुनी,अनुसया कांबळे, सुमन उडानशिव,पंचशीला भडके, शारदा लामतुरे ई. सह धम्मसेवक ग्रुप व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सदस्य, पदाधिकारी,उपासक उपासिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
error: Content is protected !!