August 8, 2025

संत सोयराबाई यांचे प्रबोधनकारी अलक्षित व्यक्तीमत्वाचे समाजाला दर्शन – ह.भ.प महादेव महाराज अडसूळ

  • कळंब -संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुणे यांच्या वतीने ‘ चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची चे प्रणेते,संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक संत साहित्याचे गाढे अभ्यासक सचिन पाटील यांनी संपादित केलेल्या ‘संत सोयराबाई व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राष्ट्रपीता महात्मा गांधी स्मृतिदिन निमित्ताने कळंब येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम सभागृहात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी ह.भ.प महादेव महाराज अडसूळ बोलत होते .
    भागवत धर्म-वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव महाराज यांच्या पाठबळ अन प्रेरणेमुळेच संत चोखामेळा संत सोयराबाई यांच्यासह संपूर्ण कुटुंबच भक्ती अभिव्यक्ती चळवळीचा भाग बनले, पंढरपूरच्या वाळवंटात जमलेल्या समस्त संत मांदियाळीत
    संत कवयित्री सोयराबाईच्या अभंगांमधून समजणार तत्त्वज्ञान अगदी सोपं आहे.त्यात जड शब्द नाहीत.भाषा साधी,सोपी आणि रसाळ आहे.अभंग आधी स्वत:साठी आणि मग जनांसाठी… आत्मशुद्धी ते परमात्मा.. असा त्यांचा प्रवास होता. शुद्रंच्या सावलीचाही विटाळ होऊन सवर्ण आंघोळ करून शुचिर्भूत होणारा तो काळ….एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते. स्वत:च त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. स्वत:शी, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवतधर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते.
    सातशे वर्षांपूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल ‘ब्र’ काढायचा विचारही केला नसता पण ही बाई थेट प्रश्नच विचारते. देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?
    देहासी विटाळ म्हणती सकळ |
    आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध |
    देहीचा विटाळ देहीच जन्मला |
    सोवळा तो झाला कवण धर्म |
    महान वारकरी संत कवयित्री यांचे अलक्षित प्रबोधनकारी कार्य कर्तुत्व ‘ संत सोयराबाई व्यक्तित्व आणि कर्तुत्व ‘ ग्रंथाद्वारे सातशे आठशेवर्षांनंतर समाजासमोर येत आहे , हे एक मोठे कार्य झाले आहे असे प्रतिपादन पुढे बोलतांना संत साहित्याचे गाढे अभ्यासक हभप महादेव महाराज अडसूळ यांनी केले .
    सदरील ग्रंथाचे प्रकाशक धर्मपरायण अन्नदाते हरिभक्त बंडोपंतजी दशरथ यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर
    अध्यक्षस्थानी ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ होते .
    याप्रसंगी कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक रवी नरहिरे , उद्योगपती हनुमंतराव चिकणे , पोलिस निरीक्षक रवी सानप , व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे चेतन कात्रे,ज्येष्ठ पत्रकार बालाजी अडसूळ , मकरंद पाटील,बालाजी बावळे, राजेंद्रजी बिक्कड,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भडंगे अध्यासनाच्या विश्वस्त श्रीमती राऊत ए.डी. सौ.सरस्वती अडसूळ, प्रा.जाधवर, वीरेंद्र गुंजाळ,स्थानिक गुन्हा शाखेचे श्रीराम मायंदे,माने,अनिल यादव, महेश जोशी,दीपक माळी,सचिन क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी केले सूत्रसंचलन प्राचार्य महादेवराव गपाट यांनी केले तर आभार बंडू ताटे यांनी मांनले.कार्यक्रमास कळंब शहरातील आध्यात्मिक तसेच साहित्यप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!