August 8, 2025

प्रशांत मते यांची विशेष सेलच्या सदस्य पदी नियुक्ती

  • धाराशिव – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव NALSA (legal service to the workers in the Unorganised sector Scheme 2015)असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना,2015 संदर्भीय मधील निर्देशांची अंमलबजावणी करणे करिता विशेष सेलची स्थापना करण्यात आली.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव वसंत यादव यांनी प्रशांत शशिकांत मते पी.एल.व्ही यांची विशेष सेलच्या सदस्य पदी नियुक्ती केली आहे.प्रशांत मते यांची १२-०२-२०२४ मध्ये विशेष सेलच्या सदस्य पदी नियुक्ती केली होती तसेच उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांची २७-०१-२०२४ रोजी दुसऱ्या वर्षी निवड करण्यात आली. सलग दुसऱ्या वर्षी त्यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!