August 9, 2025

शेतमाल योजनेच्या पहिल्या दिवशी आठ लाख साठ हजार रुपयाचे वाटप

  • कळंब – कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल योजनेच्या पहिल्या दिवशी आठ लाख साठ हजार रुपयाचे वाटप करण्यात आले.
    शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती शिवाजी कापसे यांनी केले आहे.
    कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब मध्ये शेतमाल तारण योजना प्रभावी राबविण्याकरिता मागील आठ दिवसापासून प्रत्येक गावात जाहिराती च्या माध्यमातून शेतकऱ्याचे उभोद्धन केले आहे. शेतमाल तारण योजना शेतकऱ्यांसाठी कशी प्रभावी आहे,या योजने करिता किती व्याजदर आहे याची सर्व माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. बाजार समितीने केलेल्या या आवाहानाला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रतिसाद देण्याचे सुरुवात केली. पहिल्याच दिवशी बोर्डा येथील विजेंद्र चव्हाण, कळंब येथील जोशी, हसेगाव येथील यादव, तसेच जवळा येथील शेतकरी बांधवानी शेतमाल ठेवल्यावर तात्काळ एक दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावर पैसे बाजार समितीच्या वतीने टाकण्यात आले आहेत.
    सध्या शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी तयार असून सध्या शेतमालामध्ये हवा चे प्रमाण जास्त असल्याने, बाजारभाव गडगडले आहेत. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीची कोणतीही घाई करू नये. शेतकरी बांधवानी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती शिवाजी कापसे यांनी आवाहन केले आहे.
    याप्रसंगी बाजार समितीचे संचालक लक्ष्मण कोल्हे,संचालक रोहन पारख, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे साठा अधीक्षक पी.एम.गाडे, बाजार समिती चे सचिव दत्तात्रय वाघ व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!