कळंब – पालिकेतील महिला कर्मचाऱ्याकडे लिपिक कैलास हाके हा नोकरी लावल्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करीत असल्याची तक्रार पिडीत महिला कर्मचाऱ्याने मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांच्याकडे केली आहे.मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,मी तुला नोकरीला लावले.त्यामुळे तू माझे पन्नास हजार रुपये व आस्थापना प्रमुख अजय काकडे यांचे पन्नास हजार असे एक लाख रुपये दे, अशी मागणी केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.इतकंच नाही तर सदरील महिला काम करत असलेल्या उद्यानाच्या ठिकाणी जाऊन तिला विरंगुळा रूममध्ये चल म्हणत शरीरसुखाची वारंवार मागणी करत असल्याचं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.वारंवार पैशांची व शरीरसुखाची मागणी संबंधितसदरील महिला कर्मचाऱ्याची लेखी तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली आहे.याबाबत विशाखा समिती स्थापन करून या प्रकरणाची ताबडतोब चौकशी केली जाईल.चौकशीत दोषी आढळल्यास लागलीच योग्य ती कारवाई केली जाईल,असे मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी सांगितले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले