संभाजी नगर – विधानसभा निवडणुकीत वाहिलेला पैशाचा महापूर आणि भ्रष्ट कृत्यासाठी अमेरिकन कोर्टाने गौतम अदानी वर बजावलेले वॉरंट या प्रमुख मुद्द्यावर डॉ.बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले वाड्यात ३ दिवसाचे आत्मक्लेश ( ६० तासाचे..) उपोषण केले.त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र बाबांबरोबर उभा राहिला,कारण बाबांचे हे आंदोलन नैतिक व संवैधानिक मूल्यांचे संवर्धन व संरक्षणासाठी होते. छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी भारत जोडो अभियानाच्या वतीने धरणे आंदोलनातही त्याचा पूनुरूच्चार कऱण्यात आला. परभणी येथील पोलिस कस्टडीत सोमनाथ सुर्यवंशी याला अमानुषपणे ठार मारणे असो वा मस्साजोग-बीड चे तरुण सरपंच संतोष देशमुख याची खंडणीसाठी निर्घृण हत्या असो. अशा अमानुष प्रकारांना जाती – धर्माची कवच कुंडल लावण्याची सध्या जणू कांही स्पर्धा सुरू असून,सरकार मात्र बघ्याची भूमिका बजावत आहे. त्याचाही वक्त्यांनी खरपूस समाचार घेतला,आणि दोन्ही कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी व एक एक कोटीची आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली. शेतकरी नेते सरदार जगजितसिंग डल्लेवाल हे गेले. ४७ दिवसापासून बेमुदत उपोषण करीत आहेत,त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली असून ही,त्यास सरकारचा प्रतिसाद मात्र शून्य दिसतो आहे.केंद्र सरकारने डल्लेवाल यांचेशी बोलणी करण्यासाठी प्रतिनिधि पाठवावेत अशी मागणी केली व शेतकरी नेत्याचे प्राण वाचवावे असे आवाहन केले तसेच समाजातील जातीय विद्वेशा विरुद्ध सामाजिक सलोखा अबाधित रहावा आणि सवैंधानिक मूल्यांचे जतन व्हावे यासाठी जनजागरण, संवाद व संघर्ष करण्याचाही निर्धार कऱण्यात आला म्हणून सदरील आत्मक्लेश धरणे आंदोलन आहे. या धरणे आंदोलनाचा समारोप, निवृत्त न्यायाधीश अँड.डी.एस. शेळके यांनी केला. संविधान बचाव देश बचाव अभियान,भारत जोडो अभियान व जय किसान आंदोलन स्वराज अभियानचे वतीने आयोजित धरणे आंदोलनात विविध समवीचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला.ज्यात जय किसान आंदोलन – स्वराज अभियान चे साथी सुभाष लोमटे,अँड.सुभाष सावंगीकर,साथी अण्णा खंदारे, साथी शेख खुर्रम,गांधी मिशन चे प्रा.मच्छिंद्र गोरडे,अँड.इंद्रकुमार जेवरिकर,साथी सुलभा खंदारे, प्रा.ललिता गादगे,दलीत पँथर्स चे भाई रमेश खंडागळे,श्रमिक मुक्ती दलाचे सुबेदार मेजर सुखदेव बन, सर्वोदय परिवाराचे प्रा.श्रीराम जाधव,प्रा.गीता कोल्हटकर,प्रा. करुणा गंगावणे,संभाजी ब्रिगेडचे अँड.सोमेश्वर अहिरे,शेकापचे प्रा. चंद्रकांत चव्हाण,शेतकरी संघटनेचे कैलास तवार,डॉ.जनार्धन पिंपळे,शेख अयुब,शेख खुर्रम,प्रा.तारा जाधव,प्रा.सविता अभ्यंकर,डॉ.पल्लवी अभ्यंकर, सी.पी.आय चे ॲड.अभय टाकसाळ,सी.पी.एमचे कॉ. भगवान भोजने,अँड.बाबासाहेब वाव्हळ,राष्ट्र सेवादलाचे प्रा. प्रकाश दाने,अमन कमिटीचे डॉ. शेख इक्बाल,सय्यद नूर,कचरा कामगारांच्या साथी आशाबाई डोके,मराठवाडा लेबर युनियनचे साथी छगन गवळी,साथी प्रवीण सरकटे,साथी देविदास किर्तीशाही,साथी जगन भोजने, साथी सर्जेराव जाधव,साथी प्रकाश जाधव,साथी प्रकाश ससाणे इ.प्रमुखांना सहभाग होता.
More Stories
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत
चितेगाव येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी
सरकार व माथाडी मंडळाचे गलथान कारभाराविरुद्ध माथाडी कामगारांची प्रचंड निदर्शने