कळंब – ग्रामीण व पारंपारिक कला जोपासली तरच पुढच्या पिढीला संस्कृतिक मेवा मिळणार असल्याने कलावंतासाठी व पारंपारिक कलेविषयी प्रबुद्ध रंगभूमीचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ.संजीवनी जाधवर यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलतानी केले. प्रबुद्ध रंगभूमी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभी पारंपारिक कलावंत व पत्रकार सन्मान सोहळा दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी साक्षी कोचिंग क्लासेस कळंब येथे ह.भ.प अशोक महाराज भातलंवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
पुढे बोलताना डॉ.जाधवर म्हणाल्या की,पारंपारिक कला लोप पावत असल्याच्या खुणा जाणवल्यामुळेच सुभाष घोडके प्रबुद्ध रंगभूमी या संस्थेच्या माध्यमातून कलावंतांचा सन्मान करून त्यांना नवसंजिवनी देण्याचे खूप मोठे कार्य करत आहेत.अध्यक्षीय समोरापातून ह. भ.प अशोक महाराजांनी प्रबुद्ध रंगभूमीच्या कामात सहकार्य करण्याचे अभिवचन देऊन या संस्थेने कलावंतासच नव्हे तर वंचित घटकाला न्याय दिला असल्याचे बोलून दाखवले.
या कार्यक्रमाची प्रस्तावनातून अध्यक्ष सुभाष घोडके यांनी ह्या संस्थेस दर्पण,१२-ए,८० – जी चे नामांकन मिळाले असल्याने पारंपारिक कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी संस्थेस देणगी देणाऱ्यास त्यांच्या उत्पन्न करात सवलत मिळेल असे सांगितले. या सन्मान सोहळ्याचे भारदस्त असे सूत्रसंचालन ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू आबा ताटे यांनी केले तर संस्थेचे सचिव प्रा.अविनाश घोडके यांनी आभार मानले.
या सोहळ्यात सुशाला ढवळे (दहिफळ),जानकाबाई कांबळे (बाभळगाव), शारदा वाघमारे (बाभळगाव), इंदुबाई शिंदे (सात्रा),सत्यभामा वाघमारे (बाभळगाव),अनंत हारणे (दहिफळ),अशोक भातलवंडे (दहिफळ),आशाबाई भातलवंडे (दहिफळ ),सुभाष ताटे (मस्सा) राजेंद्र बारगुले,बंडू ताटे,पत्रकार महेश फाटक,कलावंत जगन्नाथ खंडागळे (दहिफळ) आदी कलावंत,पत्रकारांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले