धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 210 कारवाया करुन 1,67,450 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-राहुल सुधाकर गायकवाड, वय 27 वर्षे, रा.औटी प्लॉट, शास्त्रीनगर, उमरगा ह.मु. श्रमजिवी कॉलेजच्या पाठीमागे उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.27.12.2024 रोजी 18.00 वा. सु. डिग्गी रोड उमरगा येथे अंदाजे 4,200 ₹ किंमतीची 40लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-शिवराम उजन्या काळे, वय 65 वर्षे, रा.मस्सा खं., ता. कळंब जि. धाराशिव हे दि.27.12.2024 रोजी 18.10 वा. सु. मस्सा खं. येथे राहत्या घराच्या बाजूला अंदाजे 1,500 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.27.12.2024 रोजी 16.00 ते 16.45 वा. सु. पो ठाणे उमरगा हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-राजु बाबुराव देशमुख, वय 50 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.00 वा. सु. कॉम्पलेक्स समोर उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 950 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-महादेव शिवराम सगर, वय 43 वर्षे, रा. म्हात्रे प्लॉट, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.45 वा. सु. अरुण वडदरे यांचे हॉटेलचे पाठीमागे पतंगे रोड उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,050 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
तामलवाडी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीसांनी दि.27.12.2024 रोजी 17.30 वा. सु. पो ठाणे तामलवाडी हद्दीत तामलवाडी ते सोलापूर जाणारे पर्यायी रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यावर तामलवाडी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-दिपक भानुदास कर्वे,वय 36 वर्षे, रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. तामलवाडी ते सोलापूर जाणारे पर्यायी रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यावर तामलवाडी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 530 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद.”
शिराढोण पोलीस ठाणे :शिराढोण पो.ठा. चे पथक दि. 26.08.2024 रोजी 19.30 वा. सु. शिराढोण पो.ठा. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना माळकरंजाच्या पुढे ढोकी ते देवळाली पाटी जवळ रोडवर आरोपी नामे-शत्रगुन अंगद कोकाटे, वय 29 वर्षे, रा.दत्तनगर ढोकी, ता. जि. धाराशिव हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे विना परवाना स्वत:चे कब्जात एक लोखंडी तलवार बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील ती तलवार जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
बेंबळी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-नानासाहेब प्रभाकर माने, वय 34 वर्षे, रा.अनसुर्डा ता.जि. धाराशिव हे व त्यांचे कुटूंबासह घराला आजुन कुलूप लावून झोपले असता अज्ञात व्यक्तीने दि.22.12.2024 रोजी 02.00 ते 02.15 वा. सु. कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 4,000, दोन मोबाईल फोन, एक घड्याळ असा एकुण 50,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नानासाहेब माने यांनी दि.27.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4),305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-मदन रामराव पवार, वय 66 वर्षे, रा. एम आय डी सी धाराशिव, ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची होंडा कंपनीची शाईन काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एए 9459 ही दि.26.12.2024 रोजी 23.00 ते दि. 27.12.2024 रोजी 06.00 वा. सु. एमआयडीसी धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मदन पवार यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-विकास भागवत खडके, वय42 वर्षे, रा. 401 ई विंग मयुन नेचर ग्लोरी फेज 1 पारसीक नगर कळवा ता. जि. ठाणे हे व त्यांचे नातेवाईक असे टॅम्पो ट्रॅव्हल्स मधून छत्रपती संभाजीनगर येथुन तुळजापूर कडे जात असताना दि.26.12.2024 रोजी 23.00ते 23.30 वा. सु. तेरखेडा शिवारातील बोरी पेट्रोल पंप ते तेरखेडा येथे अज्ञात व्यक्तीने टॅम्पो ट्रॅव्हलचे पाठीमागील शिडीवार चढुन दरवाज्याचे कुलूप तोडून डिग्गीतील 3 बॅगा मधील 23 तोळे सोन्याचे दागिने व कपडे असा एकुण 6,34,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विकास खडके यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रामेश्वर राजेंद्र कुंभार, वय 27 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 9674 ही दि.26.12.2024 रोजी 22.00 ते दि. 27.12.2024 रोजी 04.00 वा. सु. रामेश्वर कुंभार यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रामेश्वर कुंभार यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे :दि.21.12.2024 ते दि.22.12.2024 रोजी 12.00 ते 03.00 वा. पुर्वी ए.एम.पी. सोलार सिस्टिम प्रा.लि. व निमेश एनर्जी सोल्युशन प्रा.लि. शाखा गोरेगाव येथील प्लांट वरील प्रोलेक्टला लागणारे 72,000₹ किंमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रामेश्वर बाळासाहेब लाकाळ, वय 33 वर्षे, व्यवसाय इलेक्ट्रीकल इंजिनिअर निमेश एनर्जी सोल्युशन प्रा.लि. शाखा गोरेगाव, ता. कळंब जि. धाराशिव रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-आण्णासाहेब अशोक काकडे, वय 45 वर्षे, रा. समर्थ नगर, ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एएच 3106 ही दि.11.12.2024 रोजी 10.00 ते दि. 12.12.2024 रोजी 05.00 वा. सु. करंजकर हॉस्पीटल समोर समर्थनगर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आण्णासाहेब काकडे यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“संदोष मन्युष्यवध.”
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-नामदेव बालीश निकम, वय 38 वर्षे, रा.ह.मु. जवळगा मेसाई ता. तुळजापूर जि. धाराशिव व सोबत त्यांचा मित्र प्रविण इंगळे रा. जवळगा मेसाई ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 26.12.2024 रोजी 22.00 वा. सु. कार क्र एमएच 12 क्यु.टी. 7790 मधून व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडवर व्होनाळा गावाचे ओढ्याचे पुढे जात होते दरम्यान चार अज्ञात व्यक्तींनी दोन नेमप्लेट झाकलेल्या मोटरसायकलवर येवून फिर्यादी यांचे गाडीवर दोन्ही बाजूने अंडे,दगड मारुन काच फोडून नामदेव निकम व प्रविण इंगळे यांचे अंगावर पेट्रोल भरलेले पॉकेट फेकुन हल्ला केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नामदेव निकम यांनी दि.27.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 110,324(6),118(1),126(2),352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- समशेर ताहेर नदाफ, सहिदा समशेर नदाफ, साहिल समशेर नदाफ,तोसीब कचुर शेख, असमा तोसिब शेख सर्व रा मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.27.12.2024 रोजी 14.00 वा. सु. मुरुम येथे फिर्यादी नामे-आशपाक ताहेर नदाफ, वय 50 वर्षे, रा. लोहारा ता लोहारा जि. धाराशिव यांना जागेच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकूडव दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आशपाक नदाफ यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2),189(2), 191(2),190, 352, 351(2), (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- आशपाक ताहेरसाब नदाफ, सिराज आशपाक नदाफ,फयाज आशपाक नदाफ, आयाज आशपाक नदाफ सर्व रा लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.27.12.2024 रोजी 15.30 वा. सु. मुरुम अक्कलकोट रोड येथे फिर्यादी नामे-समशेर ताहेरसाग नदाफ, वय 52 वर्षे, रा.मुरुम अक्कलकोट रोड ता. उमरगा जि. धाराशिव यांना जागेच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड,लोखंडी कडा, दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-समशेर नदाफ यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2), 352, 351(2), (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“नुकसान करुन अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे- आप्पा चव्हाण, नाना कलाप्पा चव्हाण, बालाजी काळे, गणेश चव्हाण, करण चव्हाण, रमेश चव्हाण, इतर 40 ते 45 महिला व पुरुष सर्व रा. चव्हाण पारधी पिढी ढोकी, ता.जि. धाराशिव यांनी दि.26.12.2024 रोजी 14.00 वा. सु. जिल्हा कृषी कार्यालय ढोकी गट नं 35 मधील क्षेत्र 16.68 मधील कार्यालयासमोर नमुद आरोपींनी आतमध्ये प्रवेश करुन आतील शिवारीची व लिंबाचे 20 ते 25 झाडे तोडून नुकसान करुन नमुद क्षेत्रातील तुर व हरभरा पिकामध्ये 20 ते 22 झोपड्या टाकून अतिक्रमण केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शशिकांत लक्ष्मण बारबोले, वय 55 वर्षे, रा. कुर्डुवाडी रोड बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 329(3), 324(2), 324(3), 3(5) सह सार्वजनिक संपत्ती हानी अधिनियम 1984 कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ लैंगीक अत्याचार.”
मुरुम पोलीस ठाणे :एका गावातील 13 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) ही दि.26.12.2024 रोजी 14.00 ते 14.30 वा. सु. घराशेजारील शेतात तुरीच्या शेंगा आणण्यासाठी गेली असता एका गावातील एका तरुणाने तिचे पाठीमागून येवून तोंड दाबून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. यावरुन पिडीतेची आई यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64, 65(1) सह बा.लै.अ. सरंक्षण कायदा कलम 4, 8 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:मयत आरोपी नामे-सचिन माणिक माने, वय 37 वर्षे, रा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव व सोबत त्यांचा भाच्चा कार्तीक तानाजी जाधव, वय 17 वर्षे, रा. पिंपरी चिंचवड पुणे, ह.मु. ज्ञानदिप माध्यमिक आश्रम शाळा, हॉस्टेल तांबेवाडी तांडा ता. बार्शी जि. सोलापूर हे दोघे दि.26.09.2024 रोजी 18.00 वा.सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 2504 वरुन जात होते. दरम्यान कौडगाव गावाच्या पुढे मयत आरोपी नामे-सचिन माने यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलला कुत्रा आडवा आल्याने अचानक ब्रेक मारल्याने मोटरसायकल स्लीप झाल्याने सचिन माने हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर कार्तीक जाधव हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कार्तीक जाधव यांनी दि.27.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील