मोहा- ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे दि.२२ डिसेबर २०२४ रोजी ‘राष्ट्रीय गणित दिवस ‘मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप,प्रशालेचे पर्यवेक्षक मडके धनंजय यांच्या हस्ते गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक श् कमलाकर शेवाळे यांनी केले तर प्रशालेतील पृथ्वीराज माळी,कु.आदिती मडके,वैष्णवी कानडे,कु.स्नेहा कानडे,कु.सानिका बाराखोते आदीं विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच प्रशालेचे प्राचार्य संजय जगताप यांनी आपल्या मानवी जीवनामध्ये गणित किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.तसेच या प्रसंगी प्रशालेतील इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य यावेळी बनवण्यात आले होते.सहभागी तसेच प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना बक्षिस म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती पांचाळ उषा,सोलंकर शहाजी,श्रीमती स्मिता पाटील,जाधव व्ही.पी आदींनी परिश्रम घेतले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कमलाकर शेवाळे यांनी केले.यावेळी प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन