भाटशिरपुरा – भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाटशिरपुरा व कृषी विभाग कळंब यांच्या संयुक्त विद्यमानाने भाट शिरपुरा येथील नदीवर वनराई बंधारा विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या,कृषी विभागाच्या सहाय्याने वनराई बंधारा करण्यात आला. यावेळी वनराई बंधाऱ्याचे फायदे तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच यावेळी कृषी पर्यवेक्षक भुजंग लोकरे,कृषी सहाय्यक चंदनशिव, संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस, मुख्याध्यापक सुरेश टेकाळे शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्वांनी वनराई बंधारा उभारण्यासाठी परिश्रम घेतले. वनराई बंधारा उभारल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कृषी विभागातर्फे केळी वाटप करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक एस.जी.सूर्यवंशी यांनी केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले