कळंब – इनरव्हिल क्लब कळंबच्या वतीने कळंब येथील जगछाया हाॅस्पिटल येथे जागतिक मेडीटेशन दिनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी जागतिक मेडीटेशन दिनाच्या निमित्ताने मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी मेडीटेशनचे महत्त्व व फायदे याविषयी सौ.पाटील यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.यावेळी कळंब शहरातील ५६ महिलांनी यामध्ये भाग घेतला तसेच रात्री ८वाजता श्री श्री रविशंकर यांच्या ऑनलाईन मेडिटेशनसाठी इनरव्हिल क्लबच्या सदस्यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हिल क्लब कळंबच्या अध्यक्षा सौ प्रतिभा बाळकृष्ण भवर (गांगर्डे ), सेक्रेटरी डॉ.प्रियंका आडमुठे,प्रोजेक्ट चेअरमन डॉ . आकांक्षा पाटील,सौ.शितल राजमाने ,डॉ.वर्षा कस्तुरकर, डॉ.मिनाक्षी भवर,डॉ. दिपाली लोंढे, डॉ..नंदा अनिगुंठे , सौ.प्रफुलता मांडवकर,सौ.उज्ज्वला लोमटे,सौ.निशा कळंबकर,सौ.जेमिनी भिंगारे यांनी सहकार्य केले .डॉ.मिनाक्षी भवर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश