August 9, 2025

स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांना अभिवादन

  • कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे दि.२० डिसेंबर २०२४ रोजी संत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील सहशिक्षक हनुमंत रामभाऊ घाडगे यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे मंत्रमुग्ध भजन गात संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याचा परिचय उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिला. गाडगे महाराज आणि स्वच्छता यांचे नाते व राज्य सरकारने मागील काही वर्षांपूर्वी स्वच्छतेचे महत्व सांगणारी राज्यस्तरीय ग्राम स्वच्छता अभियान याबद्दलही विद्यार्थ्यांना अवगत करून स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक संतोष भोजने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक संजय ओव्हाळ,श्रीमती भारती सूर्यवंशी व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कुमारी मंजुश्री कराड यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!