धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येेथे 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे पदवी,पदव्युत्तर आणि पीएचडी पातळीवर आयोजन करण्यात आले होते. आविष्कार स्पर्धेत पदव्युत्तर पातळीवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थीनी मैथिली हेमंत सुरु आणि प्रतिक्षा बाळासाहेब नाईकवाडी यांनी “ए नाॅवेल एग हॅचिंग इनक्युबेटर ” या विषयावर कृषी व पशुसंवर्धन विभाग अंतर्गत माॅडेल, पोस्टर्स सादरीकरण केले. या स्पर्धेत त्यांनी द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. त्यांनी प्राप्त केलेल्या उत्तुंग यशाबद्दल विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ. प्रशांत दीक्षित यांचे हस्ते यशस्वी संशोधक विद्यार्थ्यांनीना पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्धी विभागप्रमुख डाॅ. गोविंद कोकणे,जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख,डाॅ.जितेंद्र कुलकर्णी,नाट्यशास्त्र व लोककला विभागप्रमुख डाॅ. महेश्वर कळलावे,डाॅ.गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
More Stories
जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव जिल्हा परिषदेत ‘सरप्राईज’ निकाल;कळंब तालुक्याची लॉटरी – दोन सभापती पदांवर झेंडा!
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी