कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रेरणेने कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप पाटील यांचे धाकटे चिरंजीव चि.शिवम संजय जगताप पाटील यांनी दत्तजयंती निमित्त जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या प्रवचन सोहळ्यात सहभागी झाले होते. श्री क्षेत्र सिमुरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी नाणीजधाम उपपीठ जगद्गुरु वयस्कर माऊलीना आधार द्यावा, कधी आई वडिलांना वृध्दाश्रमात पाठवू नका असे सांगितले. आई वडिलांसारखे दैवत या जगात कोठेही मिळणार नाही असे सांगितले.यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता तरी प्राचार्य संजय जगताप पाटील यांचे चिरंजीव शरीराने दिव्यांग असून देखील वडिलांना अटृहास करून कळंब येथून गुरुमाऊलीच्या वारीला गेले . याप्रसंगी त्यांचे लाडके मामा काका तांबारे,शिवाजी नवनाथ तांबारे,दादा तांबारे,दत्तात्रय कुंभार मामा व आंदोरा येथील प्रचंड महिला उपस्थित होत्या.यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रवचनाला उपस्थित दाखवली. महाराष्ट्रातील विविध भागांतून माऊलींचे भाविक भक्तांनी या प्रवचनाला उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी