कळंब – जागतिक एड्स दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय कळंब प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.एम.यु.शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटीसी विभाग उपजिल्हा रुग्णालय कळंब,ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब व योगेश्वरी नर्सिंग कॉलेज डिकसळ यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित युवक युवतींना प्रा. अर्चना मुखेडकर यांनी एचआयव्ही एड्स बाबत शपथ दिली. त्यानंतर डॉ.रामकृष्ण लोंढे माजी प्रदेशाध्यक्ष आय एम ए महाराष्ट्र राज्य ,डॉ.पुरुषोत्तम पाटील वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कळंब,डॉ. सुनील पवार प्राचार्य मोहेकर महाविद्यालय कळंब व प्रा.महेश इटकर अध्यक्ष योगेश्वरी नर्सिंग कॉलेज डिकसळ यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅली काढण्यात आली. सदरील रॅली दरम्यान योगेश्वरी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कळंब शहरातील मेन रोड व शिवाजी चौक येथे एचआयव्ही एड्स या विषयावर पथनाट्य सादरीकरण करून व घोषवाक्य देऊन जनजागृती केली. सदरील रॅलीस डॉ.लोंढे व डॉ. पाटील यांनी एचआयव्ही एड्स बाबत सविस्तर माहिती सांगितली तसेच आयसीटीसी समुपदेशक प्रगती भंडारी यांनी एच.आय.व्ही एड्स २०१७ कायदाबद्दल परिपूर्ण माहिती दिली. सदरील रॅली यशस्वी करण्यासाठी आयसीटीसी विभागाचे श्रीमती प्रगती भंडारी,ईश्वर भोसले व परशुराम कोळी यांनी मोलाचे योगदान दिले. या रॅलीमध्ये मोहेकर महाविद्यालयाचे एन.एस.एस.एस कार्यक्रम अधिकारी डॉ.संदीप महाजन,डॉ.राघवेंद्र ताटेपामुल, प्रा.अर्चना मुखेडकर,डॉ.श्रीकांत भोसले,प्रा.हनुमंत जाधव,डॉ. नितीन अंकुश,उपप्राचार्य मिटकरी, प्रा.संदीप सूर्यवंशी,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे व योगेश्वरी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.अर्चना साळवी,प्रा.अतुल मगर व उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन