August 9, 2025

स्टॅन्ड अप इंडिया योजना अनुसूचित जातीतील नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजकासाठी स्टॅन्ड अप इंडिया ही योजना सुरु केली आहे.
    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हयातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील १८ वर्षावरील नवउद्योजकांना १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड अप इंडिया योजनेतंर्गत ७५ टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरित फ्रॉन्ट एन्ड सबसिडी १५ टक्के राज्य शासनाकडून देण्यात येईल.
    तरी पात्र इच्छुक नवउद्योजकांनी समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
error: Content is protected !!