धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता http://mahadbtmahit.gov.in हे संकेतस्थळ २५ जुलै २०२४ पासून सुरू केले आहे. सन २०२४ -२५ या वर्षाकरिता महाडीबीटी प्रणालीवर अद्यापपर्यंत ३७५८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून त्यापैकी १७०२ अर्ज हे महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अद्यापपर्यंत अर्जांची पडताळणी करून सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण या कार्यालयाकडे सादर केले नाहीत. जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी सन २०२४ – २५ करिता आपल्या महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेले अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीचे पात्र अर्ज मंजुरीकरीता तात्काळ या कार्यालयाकडे सादर करावे. ज्या अर्जात त्रुटी असतील असे अर्ज त्रुटी पुर्तता करुनच कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करावेत.महाविद्यालयाच्या लॉगिनला एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच मागील वर्षाच्या तुलनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीचे प्रमाण कमी असून ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरलेले नाहीत,अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता महाविद्यालयस्तरावरून सूचित करावे.असे आवाहन समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान