February 9, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.21 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 75 कारवाया करुन 72,100 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • शिराढोण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-शिवाजी पंडीत घोरपडे, वय 52 वर्षे,रा. घारगाव ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 60,000₹ किंमतीची यामाहा कंपनीची मोटारसायकल तपकिरी रंगाची क्र एमएच 14 केव्ही 6887 ही दि. 17.11.2024 रोजी 22.00 ते दि. 18.11.2024 रोजी 05.00 वा. सु. शिवाजी घोरपडे यांचे राहते घरासमोरुनअज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शिवाजी घोरपडे यांनी दि.21.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढेाण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-आकाश शिवराम भोसले, वय 24 वर्षे,रा. होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल लालसर पाढंरा पट्टा असलेली काळ्या रंगाची क्र एमएच 25 बीसी 1674 ही दि. 18.11.2024 रोजी 07.00 ते 23.00 वा. सु. आकाश भोसले यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश भोसले यांनी दि.21.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-वैजीनाथ श्रीमंत पाटील, वय 48 वर्षे,रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल काळ्या रंगाची क्र एमएच 25 व्ही 1464 ही दि. 16.11.2024 रोजी 07.00 ते 09.30 वा. सु.लोहारा येथील महात्मा फुले चौक येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वैजीनाथ पाटील यांनी दि.21.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-राम हणुमंत सुतार, रा. बोळेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.11.2024 रोजी 07.00 ते 18.00 वा. सु. बोळेगाव ता. तुळजापूर मतदान बुथ क्र 410 जिल्हा परिषद शाळा खोली क्र 01 मध्ये मतदान करीत असताना मा. मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचा मतदार/ उमेदवार प्रतिनिधी यांना मतदानाचे दिवशी मतदान केंद्रमध्ये व 100 मिटर आत मोबाईल फोन आणण्यास/वापरण्यास बंदी असल्याचे आदेश असतनाही नमुद आरोपीने मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेवून जावून वापर करुन आदेशांचे उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हिरासिंग रामसिंग भोकन, वय 46 वर्षे, व्यावसाय नोकरी, रा. लातुर श्रीनगर, ता. जि. लातुर यांनी दि.21.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 223 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • ढोकी पोलीस ठाणे: मयत नामे-शिवाजी गणपती मुसळे, वय 36 वर्षे, रा. आरणी ता. जि. धाराशिव हे दि.16.11.2024 रोजी 20.00 वा. सु. शेतातुन घराकडे पायी जात होते. दरम्यान आरणी गावातील परेश शहाजीराव यांचे शेताजवळ सुंभा ते आरणी रोडवर मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 2004 चा चालक नामे- दयानंद माणिक पवार, वय 30 वर्षे, रा. आरणी ता. जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून शिवाजी मुसळे यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात शिवाजी मुसळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतीश गणपती मुसळे, वय 28 वर्षे, रा. आरणी ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1), 281 सह कलम 184 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!