August 8, 2025

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

  • धाराशिव (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे.
    त्‍याअनुषंगाने मतदार यादी विशेष संक्षीप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत 4 नोव्‍हेंबर (शनिवार) व 5 नोव्‍हेंबर (रविवार),25 नोव्‍हेंबर (शनिवार) आणि 26 नोव्‍हेंबर (रविवार) या कालावधीत जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
    या विशेष शिबिरात मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिका-यांकडून (BLO) पात्र नागरीकांची मतदार नोंदणी, दुरुस्‍ती वा वगळणीचे अर्ज भरुन घेण्‍यात येणार आहेत.मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार हे विशेष शिबिरांना भेटी देवून तेथील कामकाजाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करतील.अधिकाधिक मतदारांना त्‍यांची नाव नोंदणी करुन घेण्‍यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्‍याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
    भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार राज्‍यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुररिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारुप मतदार यादी सर्व मतदान केंद्रावर,तहसिल कार्यालय,
    उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच सर्व पदनिर्देशि‍त ठिकाणी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.तदृनंतर 27 ऑक्‍टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्‍ये नागरिकांकडून दावे व हरकती म्‍हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे,मतदार यादीतील नोंदणीच्‍या दुरुस्‍तीचे वा वगळणीचे अर्ज मागविण्‍यात येत आहेत.
    नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेवून आपले नाव मतदार यादीमध्‍ये नोंदवावे.असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्‍बासे यांनी केले आहे.
error: Content is protected !!