August 9, 2025

मतदाराच्या सर्वांगीण विकासासाठी एक संधी द्या – अजित पिंगळे

  • धाराशिव – शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी कळंब-धाराशिव मतदारसंघात दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी येडशी व ढोकी गावात मतदारांशी संवाद साधला. मतदारांशी संवाद साधताना म्हणाले की,”महायुती सरकारच्या ठोस योजना आणि विकासाभिमुख धोरणांमुळे मतदारसंघाचा विकास वेगाने होऊ शकतो. मला संधी दिल्यास शिक्षण,आरोग्य,रोजगार आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांत विशेष लक्ष देऊन मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करेन.
    “माझे राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी असून,मी कोणत्याही पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन केवळ मतदारसंघातील नागरिकांच्या भल्यासाठी काम करेन.
    याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील,शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.तर दुपारी ३ वाजता धाराशिव-कळंब मतदार संघाच्या प्रचारार्थ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक इथून रॅली काढण्यात आली.
    या रॅलीत छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा व हजरत ख्वाजा शम्शोद्दीन दर्गा व राष्ट्रमाता जिजाऊ चौकात पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    ही रॅली पुढे धारासुर मर्दिनी मंदिर,गाझी दर्गा,विजय चौक,काळा मारुती चौक,आर्य समाज बार्शी नाका,शाहू नगर,राम नगर,समता कॉलनी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,जिजाऊ चौकात पदयात्रा संपन्न झाली.
error: Content is protected !!