August 9, 2025

शेतकऱ्यांसाठी दिवाळीत सुद्धा उपोषण करणाऱ्यास निवडून द्या – नितीन बानगुडे पाटील

  • धाराशिव – प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून,शेवटच्या दिवशी देखील आमदार कैलास पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील हे देखील उपस्थित होते.कैलास पाटील यांनी ऐन दिवाळीत उपोषण केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याचं नितीन बानगुडे पाटील म्हणाले.दरम्यान,पुढे बोलताना नितीन बानगुडे पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.मला महायुतीचे काही खरे वाटत नाही येतात नुसते आश्वासन देतात.निवडणूक आली की त्यांना शेतकऱ्यांची आठवण येत आहे.आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करून देण्याची भाषा करू लागले आहेत.तुम्हाला एवढा शेतकऱ्यांचा पुळका होता तर, अडीच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली नाही? असा सवाल देखील बानगुडे पाटील यांनी महायुतीला केला.
    रँलीला आणि सभेला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
    प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची कळंब शहरातून भव्य अशी रँली काढण्यात आली.या रँलीत हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!