August 9, 2025

८५ वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग ५१६ मतदारांनी केले घरुनच केले मतदान

  • धाराशिव (माध्यम कक्ष) – लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतही ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले आणि दिव्यांग ५१६ मतदारांनी घरुनच मतदानाचा हक्क बजाविला आहे.धाराशिव विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांनी १५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या गृहभेटी दरम्यान ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ४४७ व ६९ दिव्यांग मतदारांनी घरातुन मतदान केले आहे.अशा या एकूण ५१६ मतदारांनी मतदान केले.
    गृहभेटीतून होणाऱ्या मतदानाची पूर्व कल्पना ५ नोव्हेंबर २०२४ रोजी घेतलेल्या उमेदवार यांच्या बैठकीमध्ये देण्यात आली.तसेच ८ नोव्हेंबर २०२४ रोजी बैठक घेऊन सर्व उमेदवारांना याची माहिती देण्यात आली.यासाठी पथके नियुक्त करण्यात आले आहे.या पथकात क्षेत्रिय अधिकारी,सहाय्यक मतदान कर्मचारी,सूक्ष्म निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.
    गृहभेट मतदान पथक हे ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक मतदार जिथे रहात असेल तिथे त्यांची पडताळणी करुन त्यांना मतदान करण्याची सुविधा उपलब्ध देण्यात आली.अशा एकूण १ हजार २८६ मतदारांनी घरूनच मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यापैकी गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी ५१६ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी घरूनच मतदान केले.
error: Content is protected !!