कळंब – कळंब येथे चर्मकार समाजाची बैठक राष्ट्रीय चर्मकार महासंघ जनसंपर्क कार्यालय कळंब येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम होते. यावेळी या बैठकीत शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित बप्पासाहेब पिंगळे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी अजित पिंगळे यांच्या प्रयत्नातून श्री संत गुरु रविदास महाराज येथे सभामंडपाचे काम पार पडले. त्याचप्रमाणे मागील काळातदेखील समाजाच्या विविध अडीअडचणीमध्ये अजित पिंगळे यांचे सहकार्य लाभले. यामुळे कळंब शहरातील सर्व चर्मकार समाज बांधवांनी अजित पिंगळे यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांनी अजित पिंगळे यांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून द्यावी असे आवाहन केले. यावेळी चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन