June 24, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.06 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 231 कारवाया करुन 1,59,400 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी नामे-रेणुका सुरेश राठोड, रा. शिराढोण लमाण तांडा ता. कळंब जि. धाराशिव या दि.06.11.2024 रोजी 08.10 वा. सु. शिराढोण लमाण तांडा येथे अंदाजे 9,600 ₹ किंमतीची 120 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-पदमीनी मधुकर काळे, वय 42 वर्षे, रा. सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव या दि.06.11.2024 रोजी 13.15 वा. सु. सरमकुंडी फाटा ते सरमकुंडी जाणारे रोड पासून डाव्य बाजूस पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 10,2500 ₹ किंमतीची 30लिटर गावठी दारु व 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनि द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-सुवर्णा पिंटु उर्फ देविदास शिंदे, वय 42 वर्षे, रा. इंदीारानगर पारधी पिढी पारा ता. वाशी जि. धाराशिव या दि.06.11.2024 रोजी 11.30 वा. सु. इंदीरानंगर पारधीपिढी पारा येथे अंदाजे 15,100 ₹ किंमतीची 30लिटर गावठी दारु व 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनि द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-वंदना भाग्यवंत काळे, चश्‍ 30 वर्षे, रा. बोरी पाटी ता.वाशी या दि.06.11.2024 रोजी 17.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 22,100₹ किंमतीची 32लिटर गावठी दारु व 400 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनि द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
  • परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-विद्या मोहन पवार, वय 46 वर्षे, रा. टाकळी ता. परंडा जि. धाराशिव या दि.06.11.2024 रोजी 18.40 वा. सु. जवळा नि.ते ईडा जाणारे रोडवर बानंगगा साखर कारखाना समोर डावे बाजूस अंदाजे 08,050 ₹ किंमतीची 30लिटर गावठी दारु व 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनि द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-तेजाबाई महात्मा नागीले, वय 50 वर्षे, रा.नंदगाव ता. तुळजापूर धाराशिव या दि.06.11.2024 रोजी 19.15 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 3,300 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-मोहन रामलिंग वाघमारे, वय 22 वर्षे, रा. शिंगोली ता. जि. धाराशिव,अजिंक्य अंकुश तनमोर, वय 24 वर्षे, रा. एम.आय.डी.सी. धाराशव,सुनिल छगन पवार,वय 38 वर्षे, रा. सांजा रोड इंदीरानगर धाराशिव,प्रविण हणुमंत शिंदे, वय 25 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव यांनी दि.06.11.2024 रोजी 17.30 ते 18.00 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन क्र एमएच 25 एके 0326, वाहन क्र एमएच 25 एके 2130, वाहन क्र एमएच 25 के 1870,वाहन क्र एमएच 25 एन 1087 हे येडशी ते धाराशिव रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रोहन शिवाजी धोत्रे, वय 29 वर्षे, रा.शम्स कॉलनी सांजा रोड ता. जि.धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 03.11.2024 रोजी 16.20 ते 22.00वा. सु. तोडून घरातील 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व रोख रक्कम 10.000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रोहन धोत्रे यांनी दि.06.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(1),( 2),(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-हेमंत कमलाकर गुंजोटीकर, वय 72 वर्षे, रा. गौतम नगर, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 01.11.2024 रोजी 23.00 ते दि. 02.11.2024 रोजी 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील तीन कपाटातील 11 तोळे सोन्याचे दागिने व 300 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण 5,40,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हेमंत गुंजोटीकर यांनी दि.06.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (4), 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-फयाज अहेमद खान, वय 51 वर्षे, रा.महाजन गल्ली, धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.26.10.2024 रोजी 11.00 ते दि.05.11.2024 रोजीचे18.00वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील सोन्या चांदीचे दागिने, मरुी कंपनीचा एल ई डी टी व्ही व रोख रक्कम 30,000₹ असा एकुण 43,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-फयाज खान यांनी दि.06.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (3),331(4),305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-मनिषा राजु कवडे, वय 50 वर्षे, रा.कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांचे अंदोरा शिवारातील शेत गट नं 26 मधील पत्र्याचे शेडचे पाठीमागील पत्रा कापून आतमध्ये प्रवेश करुन 20 क्विंटल सोयाबीन अंदाजे 80,000₹ किंमतीचे दि.05.11.2024 रोजी 19.00 ते दि. 06.11.2024 रोजी 09.00वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मनिषा कवडे यांनी दि.06.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 334 (1),305(बी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बालीका महादेव राठोड, वय 33 वर्षे, रा.जहागिरदारवाडी ता. जि. धाराशिव या बहिणेच्या घरी गेल्या असता त्यांचे राहते घराचा दरवाजा उघडा राहिल्याने अज्ञात व्यक्तीने दि.29.10.2024 रोजी 01.00 ते 02.00 वा. सु. घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील रोख रक्कम 35,000₹व 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 95,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालीका राठोड यांनी दि.06.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-शंकर वैजनाथ तिडके, ईश्वर शंकर तिडके दोघे रा. उमरेवाउी ता. धारुर जि. बीड यांनी दि. 10.09.2024 रोजी 15.00 ते दि. 06.11.2024 रोजी 13.00 वा. सु.गोंधळवडी येथे फिर्यादी नामे- रोहिणी आकाश रुपनर, वय 25 वर्षे, रा.गोधंळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा ट्र क्र एमएच 5-1211 हा विकत घेवून त्याचे हप्ते न भरता व ट्रक वापस न करता अविश्वासाने स्वत:च्श्या फायद्या करीता ट्रकचा वापर करुन फिर्यादी व फिर्यादीचे पती यांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या रोहिणी रुपनर यांनी दि.06.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 316(2), 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • “गावठी पिस्तुल सह आरोपी उमरगा व धाराशिव शहर पोलीसांच्या ताब्यात.”
  • उमरगा पोलीस ठाणे-मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पथक विधानसभा निवडणुक अनुषंगाने अवैध्द शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे कामी उमरगा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 06.11.2024 रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक श्री. भोसले यांना गुप्तं बातमिदारामार्फत माहिती मिळाली की, एकता अपार्टामेंन्टचे पाठीमागे साईनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव येथे राहणारा आसिफ आयुब पठाण, वय 24 वर्षे, याचेकडे एक गावठी कट्टा विनापास परवाना बेकायदेशीररित्या कब्ज्यात बाळगलेला असुन तो सदर पिस्तुल त्याची बजाज मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 0582 च्या सिट खाली लपवून ठेवली आहे.अशी खत्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर इसमास ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सदरचा गावठी कट्टा हा माझी पल्सरच्या सिट खाली आहे. त्यावर पथकाने नमुद आरोपीसह 01 गावठी कट्टा किंमत 60,000 रु, एक लोखंडी खाली मॅगझीन व बजाज मोटरसायकल सह जप्त करुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द शस्त्र कायदा कलम- 3, 25 सह मपोका 135 अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे-मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पथक विधानसभा निवडणुक अनुषंगाने अवैध्द शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे कामी धाराशिव शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 06.11.2024 रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक श्री. शेख यांना गुप्तं बातमिदारामार्फत माहिती मिळाली की, गावसुद रोड आर.टी.ओ. ऑफीसच्या बाजूच्या सार्वजनिक रोडवर धाराशिव येथे इसम नामे हुसेन पापा शेख, वय 29 वर्षे, रा. तुळजतापूर नाका धाराशिव ता. जि. धाराशिव याचेकडे एक गावठी कट्टा विनापास परवाना बेकायदेशीररित्या कब्ज्यात बाळगलेला आहे. अशी खत्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर इसमास ताब्यात घेवून त्याच्याकडील सदरचा गावठी कट्टा किंमत 60,000 रु, जप्त करुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द शस्त्र कायदा कलम- 3, 25 सह मपोका 135 अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. भोसले, धाराशिव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शेख, पोलीस उप निरीक्षक संदीप ओव्हळ, पुंजरवाड उमरगा पोलीस ठाणे व धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पथकाने केली आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!