धाराशिव – महायुतीकडुन शिवसेना शिंदे गटात अजित पिंगळे यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर शिवाजी कापसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी तो दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी परत घेतला. शिवाजी कापसे हे शिवसेना उबाठा गटातून शिवसेना शिंदे गटात आले होते मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने कापसे यांनी अपक्ष अर्ज भरला मात्र तो काढुन घेतला.यासोबतच चेतन कात्रे,अँड.धनंजय धाबेकर यांनी अर्ज मागे घेतला.यावेळी नितीन लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. कापसे यांना माननारा मोठा वर्ग आहे त्यामुळे त्यांची भुमिका महत्वाची आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला