कळंब ( माधवसिंग राजपूत ) – कळंब ही धाराशिव जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे यामुळे बाजारपेठेत धनलक्ष्मी पूजन थाटात उत्साहात केले जाते.या दिवशी व्यापारी फुलांचे हार,रांगोळी,तोरणे आकर्षक विद्युत रोषणाई करून दुकानाची सजावट करतात संध्याकाळच्या समई,दीप लावून धनलक्ष्मीची पूजा मांडली जाते यामध्ये धनलक्ष्मीची मूर्ती फोटो,पूजा साहित्य तसेच धान्य राशी गहू,तांदूळ,धने,हरभरा डाळ याचा समावेश असतो. पुढील वर्षासाठी हिशोब लिहिण्यासाठी नवीन लक्ष्मी वही खतावणी रोजमेळ याची पूजा केली जाते. यानिमित्त दीपांच्या पणती लावून परिसर उजळून निघतो आरती नंतर लाह्यांचा प्रसाद ,पेढे वाटप केले जातात या पूजा उत्सवात व्यापाऱ्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होतात. फटाक्यांच्या आतिषबाजीत पूजा संपन्न झाल्यानंतर दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या जातात .
** कळंब शहरातील मेन रोड येथे सकाळपासून झेंडू फुले , पूजा साहित्य यासाठी महिला पुरुषांची मोठी गर्दी होती सकाळपासून शंभर रुपये किलो दराने झेंडू फुलांची विक्री परिसरातील शेतकऱ्यांनी केली.
**जैन धर्मीय धनलक्ष्मी,वही पूजन करून हा सण साजरा करतात जैन धर्माचे 24 वे तीर्थंनकर भगवान महावीर यांचे महापरिनिर्वाण याच दिवशी आश्विन अमावस्याला झाले आहे. यानिमित्त श्वेतांबर जैन स्थानकात उत्तराध्याय श्लोकांचे वाचन करतात . — संजय देवडा व्यापारी
यावर्षी बाजारपेठेत दिपवाली सणाच्या खरेदीसाठी दोन दिवस आदी ग्राहकांनी किराणा,तसेच कपडे,स्टेशनरी वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसून आली.यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने नुकसान झाले तरीपण सोयाबीन हाती आली आहे परंतु याला बाजारपेठेत कमी भाव मिळत आहे.शेतकऱ्यात नाराजी असली तरी चार पैसे हातात आहे तसेच सर्वसामान्य महिलांसाठी लाडकी बहीण योजनेतून मदत झाली आहे.
** ग्राहकाचा ऑनलाइन खरेदी कडे कल श्रीमंत व मध्यमवर्गीय ग्राहकाचा कल ऑनलाइन खरेदी तसेच डी मार्ट कडे होत असल्याने बाजारपेठेतील किरकोळ खरेदी-विक्रीवर परिणाम झाला असून याचा फटका स्टेशनरी दुकानदार यांना बसत आहे — राजाभाऊ राजमाने व्यापारी कळंब.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे