धाराशिव – शहरातील भीमनगर येथील रहिवाशी युवक सागर शहाजी चव्हाण (वय ४०) यांचे अल्पशा आजाराने बुधवार,दि.३० ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील,पत्नी,दोन मुली,असा परिवार आहे. ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिवचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांचा विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्र व मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान