कळंब (जयनारायण दरक) – कळंब येथील पत्रकार धनंजय घोगरे हे मंगळवारी ( दि 17) रोजी धाराशिव वरून कळंब कडे येत असताना माळकरंजा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने घोगरे गंभीर जखमी झाले.मात्र त्याचवेळी तेथे जमलेल्या काहींनी घोगरे यांना उपचारासाठी ढोकी येथे नेत असताना त्या परिसरातील एक सराईत गुंड तेथे आला त्याने घोगरे यांना उपचारासाठी नेत असलेल्या लोकांना थांबविले व जखमी घोगरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली मात्र काहींनी मध्यस्थी करून घोगरे यांना ढोकी उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. तेथेही त्या गुंडाने घोगरे यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. अधिक वृत्त असे की,दि. 17 रोजी कळंब येथील पत्रकार धनंजय घोगरे धाराशिव येथून त्यांच्या M.H .25 A B 0353 या दुचाकीवरून एकटेच कळंब कडे येत असताना सायंकाळी 7 ते 7.30 वाचण्याच्या दरम्यान देवळाली पाटी ते माळकरंजा पाटीच्या जवळ घोगरे यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या दुचाकी वाल्याने अचानक जोराची धडक दिली.त्यामुळे घोगरे हे जोरात रोडवर पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली तर हात पायाला मार लागला तर दुसऱ्या दुचाकी वाल्याला किरकोळ जखम झाली होती. अपघातानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांनी घोगरे यांना जास्त लागल्याने व डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होत असल्याने उपचारासाठी उचलून नेत असताना त्या परिसरातील सराईत गुंड मिठू मुंडे व त्याचे साथीदार तेथे आले व त्यांनी जे लोक घोगरे यांना उपचारासाठी नेत होते त्यांनाच दमदाटी केली. घोगरे यांना मुंडे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.त्यानंतर काहींनी घोगरे यांना उपचारासाठी ढोकी येथे एका खाजगी दवाखान्यात नेहले असता मिठू मुंडे हा तेथेही आला व त्याने डॉक्टरांनाही घोगरे यांच्यावर उपचार करायचा नाही म्हणत धमकावले व परत घोगरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली मात्र तेथील काहींनी हा प्रकार थांबविला मात्र त्या ठिकाणाहून परत जाताना मीठू मुंडे यांनी तुला बघून घेतो म्हणून घोगरे यांना धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मिठू मुंडे हा त्या परिसरातील सराईत गुंड असून शिराढोन पोलिस स्टशनमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याने अनेकांना अडवून मारहाण करून लुटल्याचेही नागरिकांत बोलले जाते. दरम्यान ज्यांनी घोगरे यांना पाठीमागून धडक दिली तो विजय कराड याच्यावर वेगळा गुन्हा व मिठू मुंडे याच्यावर धमकी दिल्या प्रकरणी शिराढोन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात