कळंब – आजवर मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर ६० समाजबांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या नसून, व्यवस्थेने केलेल्या हत्या आहेत,असा आरोप करत तालुक्यातील भाटशिरपुरा येथील प्रतिक गायकवाड यांनी माझी भरचौकात हत्या करा,पण मराठा आरक्षण द्या अशी मागणी उपविभागीय अधिकारी कळंब यांच्यामार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. मागच्या दोन अडीच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी शांततामय मार्गाने लढा उभा केला आहे.तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काहींनी टोकाची भूमिका घेत आत्महत्येचा मार्ग पत्करला.यातच तालुक्यातील भाटशिरपुरा येथील प्रतिक प्रकाश गायकवाड याने आरक्षणासाठी आतापर्यंतच्या आत्महत्या कमी वाटत असतील तर सरकारने माझी भर चौकात हत्या करावी पण आरक्षण द्यावे,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून एक प्रत त्याने कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांना दिली आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात