- धाराशिव (जिमाका) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्यावतीने आयोजित राज्यस्तर शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा (१९ वर्षाखालील मुले व मुली) सन २०२४- २५ चे आयोजन छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव येथे १५ ते १७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आले आहे.
या राज्यस्तर शालेय स्पर्धेत राज्यातील १९ वर्षे वयोगटातील आठ विभागातील एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत.राज्य स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील आठ विभागातुन २५० खेळाडू, संघव्यवस्थापक,मार्गदर्शक व निवड चाचणीसाठी आठ विभागातुन एकूण ४० खेळाडू,तांत्रिक समिती सदस्य, निवड समिती सदस्य,संघटनेचे प्रतिनीधी व स्वयंसेवक असे एकूण ३५० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत.
राज्यस्तर शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,लातूर विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी अंकुश पाटील,राजकुमार दिवटे, राजकुमार दहीहांडे,रविंद्र जानगवळी, गिरजाप्पा दहीहांडे,जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे आश्रयदाते मनथप्पा पाळणे,राजर्षी शाहु शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे,उपाध्यक्ष अविनाशराव देशमुख कार्याध्यक्ष एम.डी.देशमुख,सचिव धनंजय पाटील,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे उपस्थित राहणार आहे.
या शालेय राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे.महाराष्ट्र राज्याचा व्हॉलीबॉल संघ निवडण्यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने ५ सदस्यांची निवड समिती नियुक्त केली आहे.निवडला गेलेला महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील मुलांचा संघ तेलंगाना येथे व १९ वर्षाखालील मुलींचा संघ आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी बी.के.नाईकवडी,कैलास लटके,अक्षय बिरादार,क्रीडा मार्गदर्शक श्रीमती डिम्पल ठाकरे,शुभांगी रोकडे सह सर्व कर्मचारी, धाराशिव जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव सचिन पाळणे,सहसचिव संजय देशमुख, छत्रपती शिवाजी हायस्कुलचे मुख्याध्यापक पी.एन.पाटील,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.राज्यस्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील खेळाडू,युवक- युवती, क्रीडा प्रेमी नागरिक यांनी छत्रपती शिवाजी हायस्कुल येथे उपस्थित राहुन स्पर्धेचा आनंद घ्यावा.असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला